dipak's profileMohitezPhotosBlogListsMore Tools Help

Blog


    11/25/2008

    A visit to Shrivardhan

    ह्या वर्षी वाढदिवसाला आम्ही हरिहरेश्वर ला जायचे ठरवले. पण नेहमी प्रमाणे उशीर झाल्या मुळे आम्हाला MTDC चे बुकिंग मिळाले नाही. मग आम्ही ऑनलाइन सर्च करून श्रीवर्धन ला जयाचे ठरवले. श्रीवर्धन ला होटल shivshantiholidayinn मद्धे बुकिंग केले. होटल च्या वेबसाइट वर त्यांची डिटेल्स आहेत.
    सकाळी ८:३० ला आम्ही प्रवास सुरु केला. स्वप्निल मार्फ़त इंडिका कार बुक केली होती. जवळ जवळ ४.३० ते ५ तासानी आम्ही मुंबई गोवा महामार्गावारून मान्डगाव म्हाळसा करीत श्रीवर्धन ला पोहचलो. म्हाळसा कडून रोड तसा चांगला नाहीय.दुपार चांगलीच झाली होती त्यामुले भूक सपाटून लागली होती.
    होटल वर रूम चे पैसे देऊ केले आणि जेवण विचारले तर त्यानी आम्हाला च विचारले की येताना फ़ोन का केला नाहीत ते. म्हटल तुमच्या कड़े रेस्तौरेंट आहे तर मग जेवण ready का नाही? त्यावर उत्तर मिळाले की जेवण आर्डर प्रमाने बनवले जाते. फ़क्त २ प्लेट नॉन-वेज बिरयानी होती आणि आणि आम्ही तर तिघे होतो. मग उगीच वेळ न काढता मी सरळ बाहेर पडलो आणि होटल कलाप्रसाद मधून वेज जेवण आणले. ह्या होटल मद्धे ही एक गैरसोय आहे.
    वेज जेवण मिळताना मुश्किल आहे. काही विचारले की सांगतात की समप्ले आहे बाजारातून आणावे लागेल.
    रूम वगैरे छान आहेत पण बाथरूम स्वच्छ नव्हती. मी स्वतः २ झुरळ bathtub मद्धे पकडली. बायको ला सांगितले नाही नाहीतर तिने लगेच तिथून काढता पाय घेतला असता. असो!
    त्यादिवशी आम्ही संध्याकाळी फ़क्त beach वर जाउन आलो. रात्री होटल वरच जेउन घेतल.
    दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्ता करून हरिहरेश्वर ला निघालो. हरिहरेश्वर तिथून अर्ध्या तासा वर आहे. अन्दाजे २० किलोमीटर. हरिहरेश्वराचे दर्शन घेतले आणि मग तिथेच एका घरगुती जेवणाची सोय असलेल्या खानावळीत जेवलो आणि  MTDC च्या रिसॉर्ट वर आलो. MTDC चे रिसॉर्ट ख़रच खुप छान दिसते. अगदी समुद्रा लगत आहे. इथे मस्त पैकी स्पीड बोट ची ride घेतली. खुप मज्जा आली. ५० रुपये एका ride साठी.
    cont....
    11/14/2008

    ग़ज़ल

    एक सुंदर ग़ज़ल वाचली मायबोली वेबसाइट वर ती इथे देत आहे.

    ती अजून रुसते बिसते - पण काही बिघडत नाही!
    ह्रदयात जरासे तुटते.. पण काही बिघडत नाही!

    अंदाजे मोजत असतो दुःखांची संख्या आता
    बेरीज जराशी चुकते, पण काही बिघडत नाही!

    सगळ्यांची सगळ्यांसोबत ओळख इतकी झाली की
    सगळ्यांना सगळे कळते - पण काही बिघडत नाही!

    कानावर येते की तो अवतार वगैरे घेतो
    ही खात्री बित्री नसते, पण काही बिघडत नाही!

    अत्यंत काळजीपूर्वक आयुष्य फाडल्यावरही
    एखादी कविता उरते.. पण काही बिघडत नाही..

    आता कळते की तेव्हा जे बिघडत गेले ते ते
    बहुदा घडलेही नव्हते! पण काही बिघडत नाही..

    - वैभव जोशी

    सौजन्य:

    http://www.maayboli.com/

     

    11/3/2008

    Sad Day

    Today I lost my new mobile HTC3450 Touch while going for a client meeting.
    Just 2 months back i took this mobile and today lost it. I went to Police station launch FIR, stopped my SIM card at mobile gallary.
    Arhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh such a pain. Rs.14000 Loss!
     
    Sad